image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here

प्रस्तावना

पुणे जिल्हा नैसगिर्कदृष्ट्या व मानवनिर्मित आपत्ती प्रवण आहे.जिल्ह्याचा भूभाग भूकंप प्रवण झोन 3-4 च्या विभागात येतो .औद्योगिक क्षेत्रात जिल्हा आघाडीवर आहे.जिल्ह्याचे विकासासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. जिल्ह्यात 2005-2006 सालात पश्चिम भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व बिगर पाणलोट क्षेत्रामध्ये आचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली.जिल्हा प्रशासनातील सर्व खाती तसेच संरक्षण विभाग व अन्य विभागांच्या मदतीने आपण त्या परिस्थितीचा यशस्वीपणे मुकाबला करु शकलो.या पाश्र्वाभूमीवर या वर्षी अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती पूर्व नियोजन, प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी करावयाच्या उपाय योजना आणि आपत्तीनंतरच्या काळात पार पाडावयाची कामे याबाबत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सुयोग्य माहिती असणे आवश्यक आहे.आपत्ती व्यवस्थापनाबाबत जिल्हा, तालुका व गाव स्तरावरील संबंधित सर्व घटकांचे प्रशिक्षण व सबलीकरण,जनजागृती व प्रसिध्दीबाबत विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा,गाव व तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे योग्य प्रकारे नियोजन करणे व आवश्यक उपाययोजना राबविणे ,राज्य व केंद्र शासनाची संपर्क यंत्रणा प्रभावी करणे याबात सर्व विभागाच्या अधिका-यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या तीनही टप्प्यावर निश्चित कोणतही कार्यवाही करायची आहे.यासाठी आपत्ती व्यवस्थापन आदर्श कार्यप्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील नद्यांची माहिती

अ.क्र. नदीचे नाव अंतर कि.मी. तालुके
मुळा 50 मुळशी,हवेली,पुणे शहर
कुंडलिका 35 मुळशी, मावळ
पवना 48 मावळ,हवेली,पुणे शहर
मुठा 70 मुळशी,हवेली,पुणे शहर
मास 30 मुळशी व हवेली
आंबी 26 मुळशी व हवेली
घोड 125 आंबेगाव,खेड,शिरुर
मीना 80 आंबेगाव, जुन्नर
कुकडी 95 जुन्नर
१० आर 32 जुन्नर
११ भिमा 300 आंबेगाव,खेड,शिरुर
१२ आंध्रा 25 मावळ,खेड,हवेली
१३ हंगा 85 जुन्नर
१४ निरा 190 बारामती,इंदापूर
१५ येलवंडी 30 भोर,इंदापूर
१६ गुंजवणी 50 वेल्हा,भोर
१७ क-हा 95 पुरंदर,भोर
१८ भामा 56 खेड,शिरुर
१९ इंद्रायणी 85 मावळ,खेड,हवेली
नद्या व प्रकल्प

अ.क्र. नदीचे नाव प्रकल्प एकूण पाणीसाठा टीएमसी एकूण संकल्पीत विसर्ग क्षमता (क्युसेस)
कुकडी उपखोरे
कुकडी कुकडी 3.30 1,14,989
माणिकडोहकुकडी10.8851,715
डिंभेघोड13.5077,034
वडजमिना1.2753,501
पिंपळगाव जोगेआर8.3125,248
चिल्हेवाडीपुष्पावती1.0057,250
घोड घोड7.632,61,685
भीमा खोरे
चासकमान भिमा8.551,41,676
आंध्राआंध्रा2.921,08,050
वडीवळे कुंडली1.1326,515
भामाभामाआसखेड2.9162,470
मुळा मुठा खोरे
मुळामुळशी18.4767.240
पवनापवना10.7744,566
पवनाकासारभाई0.473,30,390
मुठाटेमघर2.2712,120
आंबीवरसगाव13.2152,698
मोशीपानशेत10.7742,036
मुळा-मुठाखडकवासला3.0498,766
भिमाउजनी109.986,41,119
नीरा खोरे
निरानिरादेवधर7.6450,650
गुंजवणीगुंजवणी0.7042,375
निरावीर9.821,86,917
येळवंडीभाटघर23.77 57.871
करानाझरे9.8263,715
नदी व पूरप्रवण गावे

अ.क्र. नदीचे नाव धरणे तालुका बाधित गावांची संख्या बाधित गावांची नावे
निरानिरादेवधरभोर3प-हाटी, लुमेवाडी,निरा
क-हाबारामती1बारामती
मुठापानशेत,वरसगाव,टेमघरमुळशी/ वेल्हा हवेली/ पुणे शहर9हिंगणे खुर्द( आनंदवाडी,विठ्ठलवाडी,ऐरंडवणे(पुलाची वाडी) शिवाजीनगर (पाटील इस्टेट),येरवडा(शांतीनगर,इंदीरानगर),संगमवाडी ,लोणीकाळभोर,चांदे,वाकड )
मुळापवना,मुळशीमुळशी/ पुणे शहर7औंध,दापोडी,सांगवी,बाणेर,हिंगणगाव,पिंपर,चिंचवड
पवना पवनाहवेली/ पुणे शहर8कासारवाडी,फुगेवाडी,पिंपळेसौदागर,पिंपळेगुरव, रहाटीणी,चोवीसावाडी,निरगुडी,सांगवी.
भामाभामा आसखेडखेड1राजगुरु नगर
भिमाजासकमानखेड2आळंदी, सांगुर्डी
वेळशिरुरशिरुर
घोडडिंभे/घोडआंबेगाव शिरुर11चांडोली,पारगाव,निगुडघर,नारोडी,चिंचोली,जावळे,गणेगावदुमाला,बाभुळसर,तांदळी,शिवतकक्रार,म्हाळुंगे
१०निनावडजजुन्नर2सावरगाव, नारायणगाव
११भिमाउजनीशिरुर/हवेली/दौंड26पिंपरीसांडस,डोंगरगाव,बुक्रेगाव, पेरण,आष्टापूर,नाव्हीसांडस,वढू खुर्द,कोरेगाव भिमा, डिग्रजवाडी,विठ्ठलवाडी,वडगाव रासाई,वढू बुद्रुक,आपटी,रांजणगाव,नांदूर,वडगाव,काशिंबे,गोनवडी,दौंड, खोरवडी, वडगावढेरे, पेडगाव, सोनवडी,मलठण,बावडा,गणेशवस्ती,भांडगाव
१२इंद्रायणी मावळ,खेड हवेली10भावडी,पुलगाव,सांगवी,सांडस,वढू बुद्रूक, देहू,लोणावळा,कामशेत,मावळ,आळंदी
१३इंद्रायणीखेड1सांगुर्डी
१४भिमाइंदापूर1निरानरसिंगपूर
रेनगेजची माहिती व स्थाने
पूर परिस्थितीची कारणे
 • अतिवृष्टी
 • धरणातून मोठ्या प्रमाणावर सोडलेला विसर्ग
 • धरणांचा फुगवटा
 • नदीपात्रातील अतिक्रमणे
 • पूर रेषेतील वसलेल्या लोकांचा स्थलांतरास विरोध
जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरण

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दिनांक 25/5/2006 रोजी स्थापन करण्यात आले

जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणाची रचना
 • जिल्हाधिकारी, पदसिध्द अध्यक्ष
 • अध्यक्ष,जिल्हापरिषद,पदसिध्द अध्यक्ष
 • मुख्य कार्यकारि अधिकारी,जिल्हापरिषद,सदस्य
 • जिल्हा पोलिस अधिक्षक, सदस्य
 • जिल्हा शल्य चिकित्सक,सदस्य
 • कार्यकारि अभियंता,सार्वजनिक बांधकाम ,सदस्य
 • कार्यकारिअभियंता , पाटबंधारे ,सदस्य
 • मुख्य कार्यकारि अधिकारी,सदस्य
 • अप्पर जिल्हा दंडाधिकारी ,सदस्य
 • निवासी उपजिल्हाधिकारी,सदस्य

आपत्ती व्यवस्थापन कार्यात विविध शासकिय विभागांच्या कार्यालयामध्ये योग्य समन्वय राहवे या उद्देशाने महापालीका, नगरपालिका,पालिका,तालुका,पातळीवर व गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितींची स्थापना करण्यात आलेली आहे.

आपत्ती व्यवस्थापन - पुणे जिल्हा पथदर्शी
जिल्हा नियंत्रण कक्षाअंतर्गत उपलब्ध साधनसामुग्री

अ.क्र. साहित्याचे नाव संख्या
रबर बोट04
जीवन रक्षक जॅकेट37
लाईफ बोयाज (रिंग)24
नायलॉन रोप04
प्रथमोपचार पेटी04
गॅस कटर04
करवत (60एमएम)04
नोज मास्क08
हातोडे (10 किलो)08
१०सेफ्टी व्हेट्स04
११की होल सॉ 04
१२बॅटरी (ड्राय सेल ) 04