image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here

कुळकायदा शाखाशाखेविषयी

 • कुळकायदा शाखा ही अप्पर जिल्हाधिकारी यांचे अंतर्गत कर्यरत असून जमीन संदर्भातील विविध परवानगी मिळणेसाठी या शाखेकडे अर्ज करावा लागतो. त्यानुसार उपजिल्हाधिकारी (र.रा.) हे मा. अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे प्रकरण सादर करतात. तसेच काही प्रकरणामध्ये मा. जिल्हाधिकारी निर्णय घेतात व काही प्रकरणांमध्ये मा. विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते तर काही प्रकरणे मा. विभागीय आयुक्त किंवा शासन स्तरावर निर्णय घेणेसाठी पाठविली जातात.
 • या शाखेमध्ये खालील कायद्याअंतर्गत विविध परवानगी दिली जातात.
  • 1. मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 कलम 63 (1) शेतकरी नसलेल्या व्यक्तीस जमीन खरेदी करण्यास परवानगी दिली जाते.
  • 2. महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 नुसार बिगर शेतीसाठी परवानगी दिली जाते.
  • 3. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ नुसार आदिवासी ते बिगर आदिवासी शासनाच्या मान्यतेने जमीन विक्री परवानगी.
   कलम 36(2) नुसार आदिवासी ते आदिवासी जमीन विक्री परवानगी
  • 4. मुंबई कनिष्ठ गाव नोकर वतने नष्ट करणे अधिनियम 1958 अन्वये महार वतन जमीनीची विक्री परवानगी दिली जाते.
  • 5. शासन निर्णय दि. 2 डिसेंबर 1908 व 1913 नुसार शासनाच्या पूर्व मान्यतेनंतर देवस्थान जमीन इनामातून कमी करुन विक्रीस परवानगी दिली जाते.
  • 6. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम मधील नियम 1971 नुसार (सरकारी जमीनीची विल्हेवाट लावणे) कलम 26 नुसार शासनाच्या पूर्व मान्यतेनंतर जमीन विक्री परवानगी दिली जाते.

आदिवासी जमीन विक्री


इनामवर्ग ६ व महार वतन जमीन


सिलींग व कुळकायदा जमीन


महाराजस्व अभियान