image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here

महसूल शाखा


शाखेविषयी

जिल्हाधिकारी यांचे अख्त्यारीतील सर्वात महत्वाच्या शाखेमध्ये महसूल शाखेचा समावेश होतो. जिल्हाधिकारी कार्यालयाचा कणा म्हणूनही महसूल शाखेकडे पाहिले जाते. महसूल शाखेतून शासकीय जमिनविषयक बाबी, शासकीय वसूली, अकृषिक परवानगी, जिल्हा आस्थापना इ. महत्वाच्या बाबींवर नियंत्रण व कामकाज होते. जिल्हयातील सर्व उपविभाग व तहसिल यांचा मा.विभागीय आयुक्त व मा.राज्य शासन यामधील दुवा म्हणून महसूल शाखा सदैव कार्यरत असते.

कार्यालयीन रचना


कामकाजाचे स्वरूप

 • १. सार्वजनिक प्रयोजनाकरीता शासकीय/गायरान जमिनींचे वितरण करणे.
 • २. शासकीय पड व गायरान जमिनींवरील निवासी / वाणिज्य प्रयोजनाकरीता अतिक्रमण नियमित करणे.
 • ३. वाडयांचे महसूली गावात रूपांतरण करणे
 • ४. महानगरपालिका / नगरपालिका हद्दीतील शेत जमिनीचे विकास परवानगी संदर्भात विनिश्चिती पत्र / ना-हरकत प्रमाणपत्र देणे.
 • ५. पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण हद्दीतील शेत जमिनीस निवासी / वाणिज्य / औद्योगिक प्रयोजनार्थ अकृषिक परवानगी देणे.
 • ६. शासनाने वाटप केलेल्या नवीन शर्तीच्या शेतीच्या जमिनी खरेदी विक्रीस परवानगी प्रकरणे
 • ७. वन जमिनीबाबतचा पत्र व्यवहार व नाहरकत प्रमाणपत्र
 • ८. कर्मचारी चयन आयोग, लोकसेवा आयोग व एमएचटी/सीईटी परिक्षा घेणे
 • ९. शासकीय वसुली
 • १०. आरआरसी वसुली
 • ११. जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे कामकाज
 • १२. स्मशानभूमी साठी शासकीय जमिन उपलब्ध करुन देणे.
 • १३. महालेखापाल अहवाल, अंतर्गत लेखा परिक्षण अहवाल, लोकलेखा समिती परिच्छेद
 • १४. वर्ग-1 व 2 कर्मचारी आस्थापना विषयीक बाबी
 • १५. वर्ग-3 कर्मचारी बदल्या व नेमणूक, लिपीक व तलाठी भरती
 • १६. महसूल अर्हता परिक्षा
 • १७. अ.का. /मं.अ. संवर्गातील पदोन्नती
 • १८. स्वातंत्र सैनिकांचे नोकरीसाठी नामर्निदेशन
 • १९. अशंकालीन व जनगनना कर्मचा-यांची यादी ठेवणे
 • २०. वर्ग- 1, 2, व 3 अधिकारी / कर्मचाऱ्यांचे रजा
 • २१. अनुकंपा रजिस्टर
 • २२. वर्ग-4 च्या नेमणूका,बदल्या व भरती
 • २३. तलाठी यांचे विभागीय बदल्या
 • २४. पुणे जिल्हयातील तलाठी संवर्गाची जेष्ठता यादी तयार करणे
 • २५. वर्ग-3 वाहनचालक यांच्या नेमणूका, बदल्या व भरतीचे कामकाज
 • २६. विभागीय चौकशी
 • २७. अधिकारी व कर्मचारी तक्रार
 • २८. दुय्यम सेवा परिक्षा
 • २९. अधिकारी व कर्मचारी गोपनीय अहवाल
 • ३०. स्वेच्छा सेवानिवृत्ती
 • ३१. शासनाने जमीन प्रदान केलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्लॉट / फ्लॅट हस्तांतरणाचे कामकाज

शाखांतर्गत कामे

 • केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभांगामार्फत राबविण्यात येणाऱ्या सार्वजानिक सुविधा (Public Utility) व सार्वजानिक प्रयोजन (Public Purpose) करिता शासकीय कार्यालयांचे इमारत बांधकामाकरीता, सहकारी गृहनिर्माण संस्था निवासी प्रयोजनाकरीता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना विद्युत उपकेंद्र उभारणीकरीता, प्राथमिक आरोग्य केंद्र / शासकीय दवाखाने इ. सार्वजनिक उपक्रम बांधकामाकरीता शासकीय / गायरान जमिनींचे वितरण (शासन निर्णय दि.12 जुलै 2011 नुसार गायरान / गुरचरण अथवा गावकऱ्यांच्या सार्वजानिक वापरातील जमीन कोणत्याही व्यक्ती, खाजगी संस्था, संघटना यांना कोणत्याही प्रयोजनासाठी मंजूर करण्यात येत नाहीत.)
 • 1) महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1971 (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम 5,6,7,27,28,29,31 व 32
 • 2) शासनाकडील निर्णय क्र जमीन 03/2011/ प्र.क्र.53/ज-1 दि. 12 जुलै 2011
 • 3) शासन महसुल व वन विभाग निर्णय क्र. जमीन 05/ 2011/प्र.क.90/ ज-1 दि. 27 जुलै,2011
 • अपर जिल्हाधिकारी / जिल्हाधिकारी / विभागीय आयुक्त / शासन
 1. 1) अर्जदार यांचा जमिन मागणीचा अर्ज.
 2. 2) जागा मागणी प्रस्ताव हा संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यांचे मार्फत सादर करणे आवश्यक आहे.
 3. 3) जागा मागणी केलेल्या मिळकतीबाबत शासन पत्र महसूल व वन विभाग क्रमांक जमीन-01/ 2008/ प्र.क्र/175/ज-1 दिनांक 9 फेब्रुवारी, 2010 सोबतचे सहपत्र अ-ब-क-ड मध्ये संबंधित विभागाने माहिती सादर करणे आवश्यक आहे (विवरणपञ अ-ब-क वर संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यांची स्वाक्षरी आवश्यक).
 4. 4) जागा मागणी प्रकरणामध्ये शासनाची मंजुरी असलेस त्याबाबतची शासन पत्राची प्रत जोडणे आवश्यक.
 5. 5) जागा मागणी केलेल्या प्रयोजनाबाबत निधी उपलब्ध असलेबाबतचा तपशिल.
 6. 6) जागा मागणी केलेल्या जागेबाबतचा मोजणी नकाशा / कच्चा नकाशा (लाल रंगाने मागणी केलेले स्थान दर्शविणे आवश्यक)
 7. 7) जागा मागणी प्रकरणामध्ये मागणी केलेल्या प्रयोजनाकरीता बांधकाम आराखडयांबाबतचा तपशिल.
 8. 8) जागा मागणी प्रकरणातील मिळकतीबाबतचे चालू 7/12, फेरफार व गांव नमुना नं 1 ची प्रत.
 9. 9) संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसभेचा ठराव.
 10. 10) जागा मागणी केलेल्या जागेचा पंचनामा.
 11. 11) संबंधित तहसिलदार यांचा अ-ब-क-ड या विहीत नमुन्यातील अहवाल.
 12. 12) संबंधित उपविभागीय अधिकारी यांचा अ-ब-क-ड या विहीत नमुन्यातील अहवाल.
 13. 13) सहायक संचालक नगररचना विभाग यांचा नियोजनाचे दृष्टीने अभिप्राय.
 14. 14) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांची शिफारस तसेच स्थानिक प्राधिकरण शिफारस (जि.प./न.पा./म.न.पा.)
 • निवासी व वाणिज्य प्रयोजन
 • 1) महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1971 (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम 43
 • 2) महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 50 व 51.
 • 3) शासनाकडील शासन निर्णय क्र. एलईएन 10/2001 / प्र.क्र. 225/ज-1 दि. 4 एप्रिल 2002
 • 4) शासनाकडील शासन निर्णय क्र जमीन 03/2011/ प्र.क्र.53/ज-1 दि. 12 जुलै 2011
 • अपर जिल्हाधिकारी / जिल्हाधिकारी / विभागीय आयुक्त / शासन
 1. 1) अर्जदार यांचा अतिक्रमण नियमित करणेबाबतचा अर्ज.
 2. 2) प्रश्नाधिन मिळकतीचा 7/12 उतारा/ सि.स. उतारा.
 3. 3) अतिक्रमण नोंदवही (गांव नमुना 1 ई) चा उतारा.
 4. 4) मंडल अधिकारी यांचा स्थळपाहणी पंचनामा.
 5. 5) शासन निर्णय दिनांक 4 एप्रिल 2002 अन्वये अतिक्रमण नियमित करणेकामी येणारी दंडाची रक्कम सरकार जमा करणेस तयार असलेबाबत अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र.
 6. 6) अर्जदार मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला व तत्सम पुरावा.
 7. 7) अर्जदार यांचा रहिवास दाखला.
 8. 8) अतिक्रमणदार यांनी अतिक्रमीत जमिनीव्यतिरिक्त जमीन धारण न केल्याबाबत प्रतिज्ञापत्र. जमीन असल्यास 7/12 व 8 अ उतारे.
 9. 9) अतिक्रमीत जमिनीबाबत अतिक्रमणदाराने कर भरल्याची पावती/चलने.
 10. 10) अतिक्रमणाबाबत महसूली पुरावे व इतर.
 11. 11) संबंधित तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांचा स्वयंस्पष्ट अभिप्राय.
 • वाडयांचे महसूली गांवात रूपांतरण
 • 1) महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 4 पोटकलम (1)
 • 2) शासनाकडील शासन निर्णय क्र. टी.एल.सी. 1076/63923/य-6 दि.01/07/1976
 • अपर जिल्हाधिकारी / जिल्हाधिकारी
 1. 1) संबंधित ग्रामपंचायतीची मागणी.
 2. 2) संबंधित ग्रामपंचायतीचा सदरची वाडी/पाडा महसूली गांवात रूपांतरण करणेबाबतचा सुस्पष्ट ठराव.
 3. 3) गावातील एकुण क्षेत्र.
 4. 4) 300 वा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेबाबतचा तपशील.
 5. 5) सार्वजनिक सुख सुविधा इ. बाबतचा तपशिल.
 6. 6) महसूली गावात रूपांतरण करणेचे वाडयांचा तपशिल दर्शविणारे संबंधित उपअधिक्षक भूमी अभिलेख, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांचे संयुक्त सहिचे परिशिष्ट.
 7. 7) संबंधित तहसिलदार/उपविभागीय अधिकारी यांचा स्वयंस्पष्ट अभिप्राय.
 • निवासी, वाणिज्य व औद्योगिक
 • 1) महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 अ
 • 2) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील अधिनियम क्र. 37 दि. 22/12/2014
 • जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी
 1. 1) आयुक्त / मुख्याधिकारी महानगरपालिका /नगरपालिका यांचे विनिश्चितीपत्र/ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत पत्र तसेच त्यासोबतचा अर्जदार यांचा अर्ज व प्रस्ताव.
 2. 2) संबंधित जमिनीचे सन 1950 पासुनचे 7/12 व त्यावरील नमुद सर्व फेरफार.
 3. 3) अर्जदार हा कु.मु.धा. असलेस कु.मु.पत्राची साक्षांकीत प्रत.
 4. 4) 100/- स्टॅम्पपेपर वरील प्रतिज्ञापत्र.
 5. 5) 200/- स्टॅम्पपेपर वरील क्षतिपत्र.
 6. 6) 300/- स्टॅम्पपेपर वरील शपथपत्र-बंधपत्र.
 7. 7) मोजणी नकाशा क-प्रत.
 8. 8) आर्कीटेक्ट यांनी मंजूर केलेली रेखांकन/बांधकाम नकाशाची प्रत.
 • निवासी, वाणिज्य व औद्योगिक
 • 1) महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 44
 • जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी
 1. 1) अर्जदार यांचा विहित नमुन्यातील अर्ज.
 2. 2) संबंधित जमिनीचे सन 1950 पासुनचे 7/12 व त्यावरील नमुद सर्व फेरफार.
 3. 3) 7/12 उता-यावरील इतर हक्कातील बोजा कमी केलेबाबतचा दाखला.
 4. 4) 7/12 उता-यावरील सहकब्जेदार यांचे 100/- स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र.
 5. 5) अर्जदार हा कु.मु.धा. असलेस कु.मु.पत्राची साक्षांकीत प्रत.
 6. 6) 100/- स्टॅम्पपेपर वरील प्रतिज्ञापत्र.
 7. 7) 200/- स्टॅम्पपेपर वरील क्षतिपत्र.
 8. 8) 300/- स्टॅम्पपेपर वरील शपथपत्र-बंधपत्र.
 9. 9) उपअधिक्षक भूमी अभिलेख/ नगरभूमापन अधिकारी यांचेकडील मोजणी नकाशा क-प्रत.
 10. 10) संबंधित तहसिलदार यांचा स्थळपाहणी दाखला.
 11. 11) पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण यांनी मंजूर केलेली रेखांकन/बांधकाम नकाशाची प्रत.

एन्ड्रोईड एप्लिकेशन