image here

image here
image here

image here त्रयस्थ संस्थेकडून कामांचे मूल्यमापन

  • image hereजलयुक्त शिवार योजने अंतर्गत जलस्त्रोत बळकट करणे, नाले खोलीकरण, सरलीकरण, सिमेंट बंधारे अशी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे गुणवत्तापूर्वक व्हावीत, यासाठी सर्व कामांचे मूल्यमापन त्रयस्थ संस्थांकडून करण्यात येत आहे.
  • image hereझालेल्या प्रत्येक कामाची नोंद ठेवणे, कामाचे जिओटॅगिंग करणे, कामाच्या ठिकाणाची पूर्वीची स्थिती वा काम झाल्यानंतरची स्थिती यांची फोटोग्राफी करणे इत्यादी गोष्टीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.
  • image hereपुणे जिल्ह्यामध्ये कामांचे मूल्यमापन करण्याकरिता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे व गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे यांची निवड करण्यात आली आहे.
  • image here शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे हे मावळ, मुळशी, खेड, शिरूर, इंदापूर, बारामती व आंबेगाव या 7 तालुक्यांतील 101 गावांमध्ये झालेल्या कामांचे मूल्यमापन करणार आहे.
  • image hereगोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे हे भोर, वेल्हा, जुन्नर, हवेली, पुरंदर व दौंड या 6 तालुक्यांतील 99 गावांमध्ये झालेल्या मृद व जलसंधारणाच्या उपचारांचे मूल्यमापन करणार आहे.