image here

image here
image here

जलयुक्त शिवार अभियान काय आहे?

 • महाराष्ट्र सरकारने राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान योजना चालु केली आहे. कार्यक्रमाचा हेतू २५००० गावे पाणी टंचाई मुक्त करणे हा आहे. राज्यात जवळ जवळ ८२% क्षेत्र कोरडवाहू व ५२% क्षेत्र अवर्षण प्रवण आहे.सन २०१४-१५ मध्ये भुजल पातळीत जास्त घट झालेले १८८ तालुके (२२३४ गावे) आहेत तर २२ जिल्ह्यांतील १९०५९ गावांमध्ये टंचाई परिस्थिती जाहिर केली आहे. त्या ठिकाणी प्राधान्याने सदर "जलयुक्त शिवार अभियान" राबविणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात राज्यातील उर्वरित भागात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.त्याकरिता विविध विभागांतर्गत मंजुर असलेल्या योजनांच्या मंजुर निधीतून/ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना/आमदार /खासदार निधी/जिल्हास्तर निधी/अशासकीय संख्या /सी.एस.आर व लोकसहभाग यांच्या माध्यमातून टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

अभियानाचा उद्देश

 • पावसाचे पाणी गावाचे शिवारातच अडविणे
 • भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे
 • सिंचन क्षेत्रात वाढ करणे
 • शेतीसाठी संरक्षित पाणी
 • पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे
 • सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे (ठिबक व तुषार)
 • बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुनर्जिवीत करणे
 • पाणी पुरवठ्यात वाढ करणे
 • भूजल अधिनियम अंमलबजावणी
 • विकेंद्रीत पाणीसाठे निर्मिती
 • साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे
 • अस्तित्वात असलेले व नादुरुस्त झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुर्न:स्थापित करणे/वाढविणे (बंधारे/गाव तलाव/पाझर तलाव/केटी वेअर्स/सिमेंट बंधारे)
 • जलस्त्रोतांमधील गाळ लोक सहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे
 • वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देऊन वृक्ष लागवड करणे
 • पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव/जागृती निर्माण करणे
 • पाणी अडविणे/मुरविणे बाबत लोकांना प्रोत्साहित करणे/लोक सहभाग वाढविणे

अभियानाची व्याप्ती

 • शासकीय विभाग
 • महसूल विभाग
 • ग्रामीण विकास यंत्रणा
 • कृषि विभाग
 • पाणी पुरवठा विभाग
 • भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
 • लघु सिंचन विभाग
 • जलसंपदा विभाग
 • सामाजिक वनीकरण
 • वन विभाग
 • सहकारी संस्था व साखर कारखाने
 • लोक सहभाग
 • खाजगी उद्योजक